योग्य सूचना
" योग्य सूचना"या लेखात आपण थोडक्यात आपल्या जीवनाचा आढावा घेऊ यामुळे मनाची स्पष्टता येईल आणि तुमच्या बुद्धीच्या शाईद्वारे तुम्ही तुमचे भाग्य कसे लिहू शकता हे कळेल.
जेव्हा आपण आपला दिवस सुरू करतो तेव्हा आपण प्रथम मोबाइल किंवा वर्तमानपत्राचा चेहरा पाहतो जो जगात काय घडत आहे? याचा आरसा दाखवतो.
यामध्ये मिश्र माहिती असते - चांगली आणि वाईट. सकाळी अश्या माहितीच्या आहारामुळे मन भरून जाते. आणि यावर मनामध्ये विचाराची प्रक्रिया सुरू होते.
जे इतके चांगले नाही किंवा आपल्या नियंत्रणात नाही अशा गोष्टींबद्दल विचार करणे म्हणजे मनाच्या घरात कचरा टाकने होय.आणि आपण हेच करत आहोत. परिस्थितीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू आहे परंतु भांडवलशाही धोरणाच्या वाढत्या प्रसारामुळे मानवी मूल्य मागे पडत आहेत.आणि याचाच परिणाम म्हणून आजकाल मानवी प्रवृत्ती नकारात्मक विचार करण्याकडे जास्त वळत आहे.
मग यावर उपाय काय ?
जसं लठ्ठपणा वाढला की आपण आहारावर नियंत्रण आणतो त्याचप्रमाणे मनामधे जर नकारात्मतेचा लठ्ठपणा आला तर मन जड होते आणि योग्य निर्णय घेण्यात असमर्थ ठरते,म्हणून मनाचा आहार बदलावा.
मनाचे अन्न::
मनाचे आरोग्य हे सकारात्मक विचाराच्या आहारावर असते. त्याआधी मनाचे कार्य समजावून घेऊयात.
मानवी शरीर (विशेषत: मन) कसे कार्य करते हे स्पष्ट करण्यासाठी येथे मी तुम्हाला एक उदाहरण देते.
समजा आपल शरीर म्हणजे गाडी आणि मन म्हणजे गाडीचा चालक ; आपण गाडीच्या इंजिनमध्ये जर माती टाकली तर गाडी कशी चालेल? तुम्हाला काय वाटते? मला वाटते की गाडी सहजतेने सुरू होणार नाही,वारंवार चढ-उतार होईल याचा अर्थ योग्य इंधनामूळे जशी सहजतेने कार्य करते तशी चालणार नाही आणि काही दिवसाच्या वापरा नंतर हळूहळू ते कार्य करणे थांबवेल .
त्याचप्रमाणे, शरीर हे शाश्वत आत्म्याचे (जीवन ऊर्जा) वाहन आहे; आत्मा आपले कार्य मन, बुद्धी आणि संस्कार या तीन इंद्रियांद्वारे करतो.
मन विचार निर्माण करते आणि बुद्धी त्यांची विवेकबुद्धीशी तुलना करून पुढे जाते, त्यानंतर ते कृतीत येते आणि त्याच गोष्टींच्या वारंवार कृतीची सवय होते, ज्याला आपण संस्कार असेही म्हणतात.
यावरून आपण असे म्हणू शकतो की मन सर्वात महत्वाचे आहे; आपण त्याची काळजीपूर्वक काळजी घेतली पाहिजे. जसे योग्य अन्नाशिवाय(इंधन) इंजिन नीट काम करत नाही, त्याचप्रमाणे अयोग्य अन्नामुळे आपले मनही आपली शक्ती गमावून बसते.
मुळात मनाचे अन्न म्हणजे सकारात्मक विचार कारण ते पूर्णतः उच्च वारंवारता/ऊर्जेने भारलेले असतात. सकारात्मक विचार केल्याने मनाची शक्ती वाढते आणि शेवटी ते योग्य ऊर्जा विचारांनी दिलेल्या कार्यक्षमतेचे प्रतीक असलेल्या कृतींद्वारे प्रतिबिंबित होते.
आधुनिकीकरणाच्या युगात मानवाची जीवनशैली वेगवान आणि धावपळीची बनली आहे.आपल्याभोवती विविध प्रकारच्या गॅझेट्स असतात, ज्यात माहितीचा भांडार भरलेला आहे, जी मनासाठी तितकी चांगली नाही; वेगवान जीवनशैली बुद्धीचे कार्य थांबवते म्हणून बुद्धी फार कमी विश्लेषण व माहिती (वाईट गुणवत्ता असलेली) यावर काम करते,याचा परिणाम म्हणजे मानवी समाजाच्या कृतींना सतत गुलाम बनवणे; त्यामुळे यश अनिश्चित होत आहे ही अनिश्चितता दुर्गुणांसाठी सुपीक आहे (वासना, भय, क्रोध इ.) याचा परिणाम म्हणजे बहुसंख्य लोक दु:ख, शोक इत्यादीसह जीवन जगत आहेत.
आपण असे म्हणू शकतो की, कारच्या इंजिनाप्रमाणे (मशीन) आपले मन प्रेम, शांती, पवित्रता आणि आनंदाने जगण्यात अयशस्वी झाले होते.
फक्त मनाचा आहार बदलून; आपण आपले जीवन बदलू शकतो. मीडिया (मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही) माहितीच्या प्रसाराचा मुख्य स्त्रोत आहे; व्हायरसप्रमाणेच (आरोग्य निर्देशांकावर परिणाम करणारे चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे विषाणू अस्तित्वात आहेत) त्याचप्रमाणे सोशल मीडिया हे आपल्यासाठी व्हायरससारखे आहे आणि त्याचे कारण म्हणजे परिस्थिती हाताळण्याची आपली आंतरिक लवचिकता कमी होत चालली आहे.
💜उपाय💜
उदाहरणार्थ, आपण नेहमी म्हणतो, “मी व्यस्त आहे. माझ्याकडे वेळ नाही" या चुकीच्या सूचना आपण नकळत आपल्या वातावरणातून स्वीकारल्या आहेत आणि आणि आपले जीवन तसाच आकार घेत आहे.
स्वत: ला तपासा करा आणि बदल करा.
मनाला सुंदर विचार द्या.
उदा. माझे जीवन खूप सुंदर आहे .
माझ्याकडे पुरेसा वेळ आहे.
मी खूप भाग्यवान आहे,
इतर.
यामुळे जीवनात नवीन नवीन सुंदर अनुभव येतील आणि त्यासाठी फक्त एक पाऊल उचलावे लागेल आणि ते म्हणजे सुंदर विचार करा. सुंदर जीवन घडेल.
---- अमिता लुंगे
Very Nice thoughts
ReplyDeleteThank you ☺️
Deleteछान 🙏
ReplyDeleteThank you ☺️
ReplyDelete